दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्राथमिक चौकशी नंतरचे निष्कर्ष

दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्राथमिक चौकशी नंतरचे निष्कर्ष १ दिनांक ४.४.२०२५ रोजी राज्यस्तरावरुन नियुक्ती करण्यात आलेल्या समितीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट देवून के.मिसे ईश्वरी (तनिषा) सुशांत (आधार कार्डनुसार नाव : मोनाली गणेश रुद्रकर यांच्या मृत्युबाबतची चौकशी केली. यामध्ये डॉ. धैसास, डॉ. रुचिका कांबळे व श्रीमती रसिका सावंत यांनी तपासणी केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच नवजात अर्भक कक्षातील डॉ.शिल्पा कलानी यांची भेट करुन देण्यात आली.कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २५ महिने एनआयसीयु उपचार लागतील हे समजावून सांगितले व १० ते २० लाख रूपये खर्च लागेल याबाबत कल्पना दिली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुगणाला दाखल करुन घ्या आम्ही पैशाच्या व्यवस्थेकरीता प्रयत्न करत आहोत असे सांगितले. सदर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय अधिकृत असून डॉ.धैसास, डॉ.रुचिका कांबळे, डॉ.शिल्पा कलानी श्रीमती रसिका सावंत, श्रीमती मिनाक्षी गोसावी, श्रीमती माधुरी पणसीकर, श्रीमती शिल्पा बर्वे, श्री.सचिन व्यवहारे, प्रशासक व श्री रव...