बारामती नगर परिषद लोकसेवक विकास किसनराव ढेकळे नगररचनाकार कसा अडकला लाचेच्या जाळ्यात
बारामती नगर परिषद लोकसेवक विकास किसनराव ढेकळे नगररचनाकार कसा अडकला लाचेच्या जाळ्यात
बारामती :- बारामती नगरपरिषद हद्दीतील बांधकाम व्यावसायिक श्री भगवान संभाजी चौधर यांची निर्मिती असोसिएशन नावाची फर्म असून श्री चौधर यांना बारामती परिसरात निवासी व वाणिज्य प्रकल्प सुरू करावयाचा आहे हा प्रकल्प सुरू करण्यासाठी चौधरी यांनी बारामती नगरपरिषद येथे प्रस्ताव सादर केलेला होता . चौधरी यांच्या रुई येथील गट क्रमांक 38 क्षेत्रामध्ये निर्मिती विहार इमारत बी विंग 1 या प्रकल्पाचा प्रस्ताव नगर परिषदेचे रचनाकार श्री विकास ढेकळे यांचे कडे होता या प्रकल्पाचे संदर्भात चौकशी करणे करता श्री चौधरी 7 मार्च 2025 रोजी नगरपरिषद येथे ढेकळे यांना भेटले त्यावेळी श्री विकास ढेकळे हे चौधरी यांना म्हणाले की तुमची इमारत बांधून होईल परंतु यात आमचा काय फायदा ? असे बोलल्यावर श्री चौधरी यांनी ढेकळेंना विचारले की काय करावे लागेल? तेव्हा ढेकळे यांनी दोन लाख रुपये मला दे तुझी फाईल लगेच मंजूर करतो असे चौधरी यांना म्हणाले तेव्हा चौधरी यांच्या लक्षात आले की विकास ढेकळे नगररचनाकार यांनी दोन लाख रुपये ही कोणती शासकीय फी नसून ती लाच असल्याची चौधरी यांची खात्री झाली . चौधरी यांची ढेकळे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने श्री चौधरी यांनी 19 मार्च 2025 रोजी लास्ट वीज विभाग पुणे यांच्याकडे रीतसर तक्रार दिली श्री चौधरी यांचे रिसर्च तक्रारीनंतर ला.लु. विभागाचे पोलीस निरीक्षक श्री अमोल भोसले यांनी 19 मार्च 2025 रोजी लोकसेवक श्री विकास ढेकळे नगरच नगर बारामती नगर परिषद यांची चौधरी यांच्याकडे लाचेची मागणी आहे आगर कसे याबाबत पडताळणी करण्याचे ठरवले व विकास ढेकळे यांचे कडे पडताळणीसाठी श्री चौधरी सोबत वाईस रेकॉर्डर देऊन शासकीय पंच सोबत देऊन संध्याकाळी साडेचार वाजता नगरपरिषद बारामती येथे पाठवले त्यावेळी श्री विकास ढेकळे यांची आणि श्री चौधरी यांची भेट झाल्यानंतर बारामती परिसरातील निवासी व वाणिज्य प्रकल्पाबाबत चर्चा सुरू असताना श्री ढेकळे यांनी दोन लाख रुपये जास्त होतात असे चौधरी यांनी म्हटल्यानंतर 25 हजार रुपये कमी करून एक लाख 75 हजार करायचे असे चर्चा झाली त्यातली एक लाख रुपये कधी देऊ असे चौधरी यांनी विचारल्यावर आज किंवा उद्या द्या असे बोलून तडजोड्यांची एक लाख 75 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचेचा पहिला हप्ता एक लाख रुपये संध्याकाळी ऑक्सिजन फिटनेस क्लब बारामती येथे घेऊन येण्यास सांगितले बारामती नगर परिषदेतील नगर रचनाकार विकास ढेकळे यांचे कार्यालयात झालेल्या चर्चेप्रमाणे संध्याकाळी लास्ट न्यूज विभागाचे पथकाने तातडीने सापळा कारवाई करण्याचे ठरवून पोलीस निरीक्षक भोसले यांनी दोन पंचांसमक्ष चौधरी यांना लोकसेवक विकास ढेकळे यांनी लाच मागणी केल्याप्रमाणे त्यांनी देण्याकरता लाच रक्कम आणण्यास सांगितले त्यावेळी श्री चौधरी यांनी त्यांचे बचत खात्यातील एक लाख रुपये पोलीस निरीक्षक अमोल भोसले यांचे समक्ष दिले हजर केले त्यानुसार पोलीस निरीक्षक भोसले यांनी दोन्ही पंच व श्री चौधरी यांना पावडर व अल्ट्राव्हायोलेट दिव्यांचे उपयोग समजावून सांगितले व श्री चौधरी हजर यांनी हजर केलेल्या पाचशे रुपये च्या भारतीय चलनातील 200 खऱ्या नोटांचे नंबर एका कागदावर लिहून त्या नोटांना व दीप मंगल उद्योग समूह नाव असलेल्या पिवळ्या कापडी पिशवीला देखील पावडर लावून सदर नोटा पिशवीमध्ये ठेवून ती पिशवी श्री चौधरी यांच्याकडे दिली सदरची लाच रक्कम श्री ढेकळे यांना देणे करता चौधरी यांना व्हॉइस रेकॉर्डर लावून पंच नंबर एक यांचे सोबत ऑक्सिजन फिटनेस क्लब बारामती येथे सायंकाळी सात वाजून 45 मिनिटांनी रवाना केले श्री चौधरी व पंचांचे पाठोपाठ पोलीस निरीक्षक भोसले व उर्वरित सापळा पथक ऑक्सिजन फिटनेस क्लब बारामती परिसरात थांबून काही वेळाने श्री चौधर व त्यांचे पाठोपाठ पंच ऑक्सिजन फिटनेस क्लब येथे पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावर गेले सदर ठिकाणी श्री ढेकळे हजर होते त्यावेळी चौधर व ढेकळे यांच्यात झालेल्या चर्चेत चर्चेदरम्यान चौधर यांनी ढेकळे यांना मगाशी बोलणं झाल्याप्रमाणे एक 75 मधले एक लाख आणल्यात कुठे ठेवू का इथं देऊ असे बोलले असता श्री ढेकळे चौधरी यांना म्हणाले हो चालेल असे बोलणे झाल्यानंतर चौधरी यांनी त्यांच्या हातातील एक लाख रुपये रकमेची दीपमंगल उद्योग समूह नाव असलेल्या पिवळ्या रंगाची कापडी पिशवी चौधरी यांनी उजव्या हाताने श्री ढेकळे यांना दिली व सांगितले की एक लाख आहेत 75 नंतर ठीक यावर ढेकळे हो चालेल चालेल असे म्हणून उजव्या हाताने लाच रक्कम असलेली पिशवी स्वीकारली चौधरी यांनी लाच स्वीकारल्याचा पूर्वनियोजित इशारा केल्यानंतर पोलीस निरीक्षक भोसले व सापळा पथक त्या ठिकाणी येऊन लोकसेवक ढेकळे यांना रंगेहात ताब्यात घेतले त्यानंतर ऑक्सिजन फिटनेस क्लबचे मुख्य दरवाजासमोर कृत्रिम अंधार करून पंचा समक्ष श्री विकास ढेकळे यांचे दोन्ही हातामधील हात मोजावर व पंजाचे बाजूस अल्ट्राव्हायोलेट दिव्यांचा प्रकाश टाकला असता विकास ढेकळे यांच्या दोन्ही हाताच्या हात मोजावर पंजाचे बाजूस ऍंथ्रेसिंग पावडरच्या निळ्या रंगाची चकाकी दिसून आली सदर बाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला अशा प्रकारे एक लाख रुपये लाच घेताना नगररचनाकार विकास ढेकळे यास रंगेहात लाचलुचपत विभागाच्या पोलीस पथकाने पकडले