मुलीला पळवून नेऊन लग्न केले म्हणून मुलाचे आई वडील व आजोबा यांना मारहाण गुन्हा दाखल
बारामती तालुक्यातील पारवडी येथील कुटुंबातील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ कलम ११८ (१)३(५)३५१ (२)३५१(३)३५२ बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे एक महिला व तीन पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीच्या मुलाने १९ वर्षीय मुलीसोबत कोणासही न सांगता प्रेम विवाह केलेला आहे सध्या ते कोठे आहे हे त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नाही मुलीचे आई-वडील यांनी या गोष्टीचा मनात राग धरून मुलाचे आई-वडील व आजोबा यांना मारहाण 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता केली असल्याची घटना पारवडी तालुका बारामती येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव हे करीत आहेत