महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या 22 मार्च 2025 रोजी पुणे जिल्हा दौरा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या 22 मार्च 2025 रोजी पुणे जिल्हा दौरा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी पुणे जिल्हा दौऱ्यावर येणार असून दुपारी बारा वाजता ते काँग्रेस भवन पुणे येथे त्यांचे आगमन होणार आहे त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होईल दुपारी दीड वाजता पुणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक होईल दुपारी दोन वाजता पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक काँग्रेस भवन येथे होणार असून या बैठकीचे नियोजन माजी आमदार श्री संजय जगताप अध्यक्ष पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी केलेले आहे दुपारी अडीच वाजता पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकाऱ्यांचे बैठक असून डॉ.कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे दुपारी तीन वाजता पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार असून सायंकाळी पाच वाजता इफ्तार पार्टीस प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत हा दौरा गणेश पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी प्रसिद्धीस दिलेला आहे या मेळाव्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आजी माजी आमदार खासदार संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी सहभागी पदाधिकारी संबंधित जिल्ह्यातील स्थानिक प्रदेश पदाधिकारी संबंधित जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्ष संबंधित जिल्ह्यातील आघाडी संघटना सर्व सेल अध्यक्ष यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष पुणे ग्रामीण अध्यक्ष व पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केलेले आहे