आम्ही पोलीस आहोत असे सांगून तीन लाख 42 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून घेऊन दोन तरुण निघून गेले
आम्ही पोलीस आहोत असे सांगून तीन लाख 42 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून घेऊन दोन तरुण निघून गेले
आम्ही पोलीस आहोत आत्ताच सहयोग सोसायटी समोर एका मुलाच्या अंगावर चाकूने वार झाला आहे तुम्हाला माहिती नाही का ? आम्ही त्याचा शोध घ्यायला आलो आहोत तू दोन दोन अंगठ्या घालून चाललाय तुला कळतंय का ? येथे रस्त्याने चोऱ्या होतात असे म्हणून तुझे सोन्याचे दोन अंगठ्या लॉकेट काढून माझ्याकडे दे असे म्हटल्याने फिर्यादीने त्याच्या हातातील दोन अंगठ्या एक लॉकेट काढून त्याच्याकडे दिले त्याने सोने हातात घेऊन कागदामध्ये ते सोने ठेवले व माझ्याकडे माझा रूमाला रुमाल घेतला व त्यामध्ये सोने रुमालामध्ये ठेवल्याचे नाटक करुन व रुमाला गाठ मारून तो रुमाल फिर्यादीच्या खिशात ठेवला नंतरफिर्यादी घरी गेले असता खिशातून रुमाला काढून बघितला असेल त्यामध्ये कागदामध्ये दोन दगड होते त्यामुळे फिर्यादीचे लक्षात आले की पोलीस असल्याचे सांगून माझ्याकडील सोन्याच्या दोन अंगठ्या व चेन हात चलाखीने काढून घेऊन माझी फसवणूक केली आहे दिलीप बाबुराव जगदाळे वय 64 वर्षे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे
तीन लाख 42 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करून घेऊन दोन तरुण निघून गेले आहेत ही घटना धनेश मोटरसायकल शोरूम च्या शेजारी घडली असून फिर्यादी हे भिगवण रोड साई संभाजीनगर साईकृपा बिल्डिंग, सहयोग सोसायटीच्या मागे राहतात.बारामती शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २०४ ३ (५), ३१८(४), ३१९ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत हे करीत आहेत बारामती शहरातील सहयोग सोसायटीच्या परिसरात भर दुपारी ही घटना घडल्याने नागरिकांनी सावध राहण्याची गरज वाढली आहे