विद्या प्रतिष्ठान बॉईज हॉस्टेल मधून आयफोन १५ प्रो मॅक्स ची चोरी

 विद्या प्रतिष्ठान बॉईज हॉस्टेल मधून आयफोन १५ प्रो मॅक्स ची चोरी  


बारामती:-  बारामती येथील विद्या प्रतिष्ठान बॉईज हॉस्टेल डी बिल्डिंग मधील रूम नंबर 32 येथे राहणाऱ्या बीएससी च्या विद्यार्थ्यांचा आयफोन 15 प्रो मॅक्स चोरीला गेला आहे. 25 मार्च 2025 रोजी रात्री साडेदहा ते 26 मार्च 2025 सकाळी सहाच्या दरम्यान आयफोन चोरीची घटना घडली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे रात्री झोपताना दरवाज्याला कडी न लावल्यामुळे ही चोरी झाल्याचे दिसत आहे  विश्वजीत चंद्रकांत गोरे या विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 305 नुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार शौकत जाफर शेख हे करीत आहेत

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा