डोर्लेवाडीत तुकाराम बीज निमित्त भरलेले यात्रेत चोरट्याने तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले
डोर्लेवाडीत तुकाराम बीज निमित्त भरलेले यात्रेत चोरट्याने तीन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात 16 मार्च 2023 रोजी तुकाराम बीज निमित्त संत श्री संत तुकाराम महाराज मंदिर डोर्लेवाडी येथे यात्रा भरली होती त्या यात्रेत दर्शनासाठी सायंकाळी गेलेल्या महिला चे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरले आहे अशी तक्रार सुरेखा शशिकांत काळकुटे राहणार डोर्लेवडी यांनी दिली आहे सोन्याचे मनी मंगळसूत्र दर्शन घेऊन फिरत असताना गळ्यात नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेखा काळकुटे यांनी परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना गावातीलच आणखी दोन महिला चे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे समजले त्यामध्ये ललिता नितीन नाळे, सारिका सोमनाथ मोरे यांचेही मंगळसूत्र गळ्यातून चोरट्याने चोरून नेले आहे तीनही महिलांचे एकूण एक लाख आठ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने पळवून नेले आहे भारतीय न्याय संहिता बी एनएस 2023 कलम 303 (२) नुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पासगे हे करीत आहेत