शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान..!
शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान..!
बारामती :- (निरावागज )शेतकरी बाळासाहेब कृष्णा मदने (रा: निरावागज. मौजे घाडगेवाडी ) गट नंबर १८८ येथील क्षेत्र २० आर ऊस रविवार (दि:२) रोजी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. अर्धा एकर मधील ड्रीपलाईन संच व इतर संच या मध्ये जळून ऊसा सहित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकरी बाळासाहेब मदने हे आपल्या शेतामध्ये सकाळी मोटर सुरू करण्यासाठी निघाले होते. मात्र लांबूनच धुराचे मोठमोठे लोट पाहता मदने यांनी शेताकडे जोरदार धाव घेतली. मात्र तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता . सदर ठिकाणाची पाहणी केली असता शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला असल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब मदने यांनी दिली.