बारामतीत भर दिवसा चोरी
बारामतीतील कसबा सातवगल्ली येथे घरातील सर्वजण कुलूप न लावता बाहेर गेल्याने चोरट्याने चार तोळ्याच्या पाटल्या व पैंजण चोरी केल्याची घटना घडल्याची गुन्हा बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे
प्रशांत सुरेश सातव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी सुरेश कामानिमित्त बाहेर गेले व नंतर त्याची पत्नी व आई देवदर्शनासाठी फलटण येथे गेले असता भाऊही दुपारी बँकेत गेला परंतु दरवाजाला कुलूप लावायची विसरले या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने घरातील कपाटातून चार तोळ्याच्या पाटल्या व पैंजण चोरी करून पळून गेला
सुरेश सातव हे दुपारी साडेतीन वाजता जेवण करण्यासाठी घरी गेले असता घरातील सामान अस्ताविस्त पडलेली दिसले व घरातील लोकर ही उघडे असलेले आढळून आले भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 303 (2) नुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार शेख हे करीत आहेत