बारामतीतील मालकाच्या विवाहित मुलीवर वाहन चालकाचा हल्ला
बारामतीतील मालकाच्या विवाहित मुलीवर वाहन चालकाचा हल्ला
बारामती :- बारामती शहरातील औद्योगिक वसाहत लाईट बोर्ड समोर जळोची येथे राहणाऱ्या विवाहित मुलीवर वाहन चालकाने बियरची बाटली नाकावर मारल्याने जखमी केले आहे. 26 मार्च 2023 रोजी सकाळी दहा वाजता फिर्यादी घरी असताना तिचे वडीलाचे चार चाकी गाडीवर ड्रायव्हर असणारा सुदर्शन गजानन गायकवाड रा. अनंत आशा नगर उघडा मारुती मंदिर जवळ बारामती हा तिथे आला व त्याने मला तू तुझे लाईफ मध्ये पुढे जायचे नाही असे म्हणत मारहाण करू लागला फिर्यादीचे ओरडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील तिथे आले असता सुदर्शन गजानन गायकवाड याने हातातील बियरची बाटली फिर्यादी महिलेचे नाकावर मारून तिला जखमी केले व तिच्या हातातील मोबाईल खाली जमिनीवर आपटून मोबाईल फोडून टाकला महिलेचे नाकातून रक्त येत असल्याने सुदर्शन गायकवाड हा तेथून घाबरून निघून गेला फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहिता बी एन एस 2023 कलम 118 (1) 324 (4) 351 (2) 351( 3) 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस शिपाई नवनाथ अंकुश नलावडे हे करीत आहेत सुदर्शन गायकवाड हा विवाहित महिलेच्या वडिलांच्याकडे गेले तीन वर्षापासून चार चाकी वाहन चालवण्याचे काम करीत आहे