बारामतीत ११ वीतील मुलीला फूस लावून पळवून नेले
बारामतीतील टी सी कॉलेज मध्ये अकरावी मध्ये शिकणारी मुलगी अकरावीचे पेपर संपल्यानंतर घरी गेली नाही त्यामुळे तिचा बारामती परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून मुलीचे वडिलांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिनांक 15 मार्च 2025 रोजी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिली आहे. ही मुलगी दररोज सकाळी एस टी ने कॉलेज ला येत व कॉलेज नंतर जात होती 15 मार्च 2025 सकाळी आठ वाजता मुलगी टीसी कॉलेज येथे गेली तिचा अकरावीचा शेवटचा पेपर दुपारी एक वाजता संपला परंतु अडीच वाजेपर्यंत मुलगी घरी न आल्याने पालकांनी कॉलेजमध्ये सरांना फोन करून मुलीचे चौकशी केली मुलगी पेपरला आली होती व पेपर देऊन गेली असे सरांनी सांगितले मुलगी वेळेत घरी न आल्यामुळे मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद मुलीचे पालकांनी बारामती शहर पोलीस स्टेशन दिली आहे भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 137( 2 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलीस फूस लावून पळवून नेल्याबाबत एका व्यक्तीवर संशय ही मुलीचे पालकांनी व्यक्त केला आहे