वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वालचंदनगर व सणसर येथील मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल
येथील मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल
वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वालचंदनगर व सणसर येथील मुलींना फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल 8 मार्च 2025 रोजी वालचंद नगर पोलीस स्टेशनचे हद्दीत वालचंद नगर येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी व सणसर येथील सतरा वर्षी अल्पवयीन मुलगी फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारी दाखल झाले आहेत सणसर येथील 17 वर्षीय मुलीने सात तारखेला बारावीचे परीक्षा दिली आठ तारखे पहाटे उठून पाहिले असता मुलगी घरात मिळून आली नाही मुलीने जाताना स्वतःचे कपडे,सॅक व आईचा मोबाईल घेऊन गेले असल्याचे वडिलांनी फिर्यादीत नमूद केले आहे
वालचंद नगर येथील 14 वर्षीय मुलगी चार तारखेला दुपारी दोन वाजता दुकानातून खाऊ आणण्यासाठी जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही घराचे परिसरात गावात पंढरपूर इंदापूर माळशिरस भागात शोध घेतला असता ती मिळाली नाही म्हणून आठ तारखेला मुलीच्या आईने फिर्याद दाखल केले आहे भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023 कलम 137 ( 2) नुसार वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजकुमार दुणगे पुढील तपास करीत आहेत