बारामतीत गिरीराज हॉस्पिटल समोर दुचाकी चालकास छोटा हत्ती वाहनाने दिली धडक
बारामतीत गिरीराज हॉस्पिटल समोर दुचाकी चालकास छोटा हत्ती वाहनाने दिली धडक
बारामतीत गिरीराज हॉस्पिटल समोर दुचाकी चालकास छोटा हत्ती वाहनाने दिली धडक सचिन संपत लाल कोठारी जखमी बारामती :- 22 मार्च 2025 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सचिन संपतलाल कोठारी हे त्यांच्या जुपिटर मोटरसायकल एम एच 42 ए वाय 29 38 वरून बारामती इंदापूर रोड इंदापूर बाजूकडे घरी जात असताना गिरीराज हॉस्पिटल समोर त्यांचे पाठीमागून आलेल्या छोटा हत्ती वाहन क्रमांक एम एच 42 बी एफ 34 36 च्या चालकाने मोटरसायकलला पाठीमागून ठोस देऊन खाली पाडले त्यामुळे सचिन संपतलाल कोठारी यांच्या डोक्याला व कमरेला मार लागला असून त्यांना गिरीराज हॉस्पिटल येथील आयसीयू मध्ये औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 134 177 184 व भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 125 (अ )(ब )281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत