बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज मधील लायब्ररी मध्ये पुस्तके जमा करायला गेलेली मुलगी परत आलीच नाही.


 बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कॉलेज मधील लायब्ररी मध्ये पुस्तके जमा करायला गेलेली मुलगी विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या गेट नंबर एक मध्ये भाऊ वाट पाहत असताना परत आलीच नाही. 11 मार्च 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या लायब्ररीमध्ये पुस्तके जमा करायला गेलेली मुलगी दोन तास झाले तरी परत आलीच नाही म्हणून गेटमध्ये वाट पाहत असलेला भाऊ लायब्ररीमध्ये जाऊन बहिणीचा शोध घेतो परंतु ती तेथे मिळून आली नाही म्हणून मुलीचे वडील व भाऊ यांनी बारामती एसटी स्टँड रेल्वे स्टेशन आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु मुलगी मिळून आली नाही म्हणून मुलीचे वडिलांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. भारतीय न्यायसंहिता बीएनएस 2023 कलम 137 (2) नुसार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश गायकवाड करीत आहेत

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा