पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा


बारामती, दि.५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आणि न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाचे विभाग  प्रमुख तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. महाविद्यालयाच्या परिसरातील सर्व सुविधानीयुक्त सुसज्ज शवचिकित्सा इमारत उभारण्यात आली असून या इमारतीमध्ये शवचिकित्सा व विद्यार्थी प्रशिक्षणविषयक कामकाज करण्यात येणार आहे. शवचिकित्सागृहामध्ये शीतगृह तयार करण्यात आले असून एकाचवेळी साधारणपणे ४ मृतदेह ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉ.शिंदे यांनी दिली आहे.

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा