बारामतीत सुनेला फिनेल पाजून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न - नवरा सासू सासरा दीर जावू नणंद च्या विरुध्द गुन्हा दाखल
बारामती :- १ सप्टेंबर २०२० पासुन ते दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत माझे पती निलेश, सासु वंदना, सासरे मारूती, दिर उमेश, व मंगेश, जाऊ शुभांगी, नणंद उमा घनवट व तिचा पती नितीन धनवट रा. डोर्लेवाडी ता. बारामती यांनी मला माहेरवरून पैसे आण तसेच तु घरी आलेपासुन आम्ही कर्जबाजारी झाले आहे असे म्हणुन मानसिक व शारिरीक छळ केला आहे व हाताने मारहाण केली आहे व पती निलेश याने माझा गळा दाबुन व फिनेल पाजुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन सौ. आरती निलेश लोणकर यांनी कायदेशिर फिर्याद दिली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2025 BNS-123,85,49,115(2),351(2)(3),352,3(5) गुन्हा दाखल झाला आहे
आरती निलेश लोणकर यांच्या फिर्यादीनुसार नवरा निलेश मारुती लोणकर वय 35 वर्षे 2) सासु वंदना मारुती लोणकर वय 58 वर्षे 3) सासरे मारूती वय 65 वर्षे 4) दिर उमेश मारुती लोणकर 5) मंगेश मारुती लोणकर, 6) जाऊ शुभांगी, उमेश लोणकर मुक्ताई टाऊनशिप B1 रूम नं .10 जामदार रोड बारामती व कसबा बारामती 7) ननंद उमा नितीन घनवट वय 33वर्षे 8) नितीन घनवट वय 42 वर्षे दोघे रा. डोर्लेवाडी ता. बारामती जि.पुणे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून स.पो .नि.चेके पुढील तपास करीत आहेत