*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई
*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई .. बारामती शहरामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम तसेच व्हाट्सअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून शस्त्रे हातात घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या युवकांवर गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा इशारा बारामती पोलीस प्रशासनाने दिलेला होता, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली असून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोयता हातात घेऊन मिरवणाऱ्या पुढील आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य जामीनदार हजर करू न शकल्याने आरोपी 1)यश दीपक मोहिते , 2)शुभम उर्फ बाळू काळू जगताप दोघे रा. आमराई, बारामती 3)आदित्य राजू मांढरे रा. चंद्रमणी नगर अमराई बारामती व 4)अनिकेत केशवकुमार नामदास रा. दीपनगर भवानीनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या चौघांची मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे साध्या कारावासासाठी रवानगी केलेली आहे. बारामती शहरातील ही पहिलीच कारवाई असून सदरचा प्रतिबंधात्मक कारवा...