पोस्ट्स

BARAMATI TODAY

सुपे उपबाजारात बाजरीची उच्चांकी आवक

इमेज
सुपे उपबाजारात बाजरीची उच्चांकी आवक  बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे सुपे उपबाजार आवारात बुधवार दि.८/१०/२०२५ रोजी बाजरीची २९२० पोत्याची उच्चांकी आवक झाली. जादा आवक होऊन बाजरीस  प्रति  क्विंटल रू. ३२००/- असा दर मिळाला तर बाजरीचे सरासरी भाव रू. २८५०/- निघाले. तर गुरूवारी मुख्य बाजार आवारात १२८० नगाची आवक होऊन कमाल दर प्रति क्विंटल रू. ३५०० असा मिळाला. बाजरीस किमान दर रू.२२०० तर सरासरी रू.३००० असे बाजारभाव निघाले. तर आठवड्यात एकुण ४२०० पोत्यांची आवक झाली. चालु वर्षी समाधानकारक पाऊस आणि हवामान पोषक असल्याने बाजरीचे उत्पन्न वाढले आहे. चांगले दर मिळत असल्याने शेतक-यांनी शेतमाल स्वच्छ व वाळवुन आणावा, ज्यामुळे आणखी जादा दर मिळतील. शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार आवारात विक्री करावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.   बाजरीची आवक बारामती तालुक्यातुन तसेच शिरूर, दौंड, पुरंदर निरा, जेजुरी, मोरगाव  या परिसरातुन येत आहे. बाजरीस जादा दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे  वातावरण आहे. स्थानिक व बाहेरील पेठेतील ...

जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांचे दर तेजीत

इमेज
  जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांचे दर तेजीत   बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांची आवक कमी येत असल्याने  दरात मोठी वाढ झाली आहे. विविध भागात सुरू असलेल्या अवकाळी  व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पालेभाज्यांचे नुकसान झाले असल्याने आवक घटली आहे. ज्यामुळे भाज्यांचे दर वाढले असल्याची  माहिती समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.   मेथीची एक जुडी ३० रूपयांना  तर कोथिंबीरच्या एका पेंडीचा दर  २० रूपये  त्याच बरोबर पालक, कांदापात, शेपु, तांदुळजा, मुळा या पालेभाज्यांचे  कमाल दर प्रति पेंडी १५ ते २० रूपये निघाले. तसेच प्रति १० किलोचे किमान व कमाल दर  गवार ८०० ते १३००, वटाणा १०० ते १५० , शेवगा ८०० ते १२०० असे बाजारभाव मिळाले. गवार ६  क्विंटल,  वटाणा  ५ क्विंटल तर शेवगा १० क्विंटल आवक झाली. मिरची, काकडी, भेंडी, कारली, प्लॉवर, दोडका, टोमॅटो, शिमला या फळभाज्यांचे दर स्थिर राहुन आवकेत घट झाली. तरी शेतक-यांनी  फळे व भाजीपाला विक्रीस आणताना स्वच्छ व ...

बारामती वाहतूक शाखेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ*

इमेज
 * बारामती वाहतूक शाखेला महाराष्ट्र सुरक्षा बलाचे अतिरिक्त मनुष्यबळ* १० लोकांची नियुक्ती; वाहतूक नियमांचे होणार काटेकोर पालन_ बारामती दि.६   बारामती शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली अतिरिक्त वाहतूक आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी लक्षात घेता, वाहतूक शाखेवरील ताण कमी करण्यासाठी बारामती वाहतूक शाखेच्या विनंतीवरून बारामती नगरपरिषदेकडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अंतर्गत १० सुरक्षा रक्षक जवानांची नियुक्ती बारामती वाहतूक शाखेत करण्यात आली असून, यामुळे शहरातील वाहतूक शिस्त अधिक प्रभावीपणे राखली जाणार आहे.        बारामती पोलिस वाहतूक शाखेकडून काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. शहरातील यासाठी उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुढाकार घेतला होता. मुख्य बाजारपेठा, बसस्थानक परिसर, सर्व चौक अशा अनेक ठिकाणी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात ताण जाणवत असल्याने हे मनुष्यबळ अत्यावश्यक झाले होते.नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत १० सुरक्षा रक्षकांची नेमणूक क...

राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध

इमेज
  राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२  नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे. 

अजित पवार सोलापूर जिल्ह्यात तर बारामतीकर पाण्यात

इमेज
  बारामती शहरातील सहयोग सोसायटी जवळ असणाऱ्या भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास होत आहे त्यांचेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही त्यामुळे स्थनिक नागरिकांनी पाण्यात उतरून अमरण उपोषण सुरु केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे नुकसान पाहणी करण्याकरिता दौरा करीत आहेत तर बारामतीत पावसाने त्रस्त झालेले आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे बारामतीच्या विकासाची पोलखोल झाली असून बारामती नगरपरिषद आता तरी नागरी सुविधाकडे लक्ष देऊन प्रश्न सोडविणार का? हा खरा प्रश्न आहे. बारामती त आंदोलन होत असल्याने बारामतीच्या विकासाचा फुगा फुटला असून सुशोभीकरण ठराविक भागात आणि मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष असे चित्र आहे

धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

इमेज
  धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वारामती या पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर २०२५ रोजी जिजाऊ मंगल कार्यालय श्रीरामनगर भिगवण रोड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभेच्या सुरूवातीला जिजाऊ कार्यालयातील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी पुतळ्यास पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. संस्थेच्या संचालिका सौ जयश्री भगत, माजी संचालिका सौ किर्ती सावंत, माजी संचालिका सी अनुराधा लोंढे तसेच संस्थेच्या सभासद सौ ज्योती गाडे यांचे हस्ते धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार घालुन दिपप्रज्वलन करण्यात केले. श्री सलीमभाई सय्यद यांच्या सुरेल आवाजात देशभक्तीपर व इतर मराठी व हिंदी गाण्याने सभेची सुरूवात झाली. संस्थेचे चेअरमन मा. डॉ. श्री प्रमोद भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी सन २०२४. २५ अखेर संस्थेच्या ठेवी रू. ८५ कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. संस्थेचे वसुल भागभांडवल ३ कोटी ८९ लाख ४८ हजार इतके आहे. तर कर्ज येणे वाकी रू. रू.६३ कोटी ६७ लाख ६७ हजार ९२९ रू. इतकी आहे....

हायवा टिप्पर सह १५३ अवजड वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई..

इमेज
 * हायवा टिप्पर सह १५३ अवजड वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई..* _१५३ वाहनांवर कारवाई; तब्बल १ लाख ५८ हजार दंड आकारण्यात आला.._ बारामती दि.१०:- शहरातील वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा विचार करून बारामती वाहतूक शाखा अवजड वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवत आहे. ही मोहीम दिनांक २७ जुलै २०२५ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत चालवण्यात आली.        महिनाभरापूर्वी १६ क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईनंतर डंपर, टिपर, काँक्रिट मिक्सर, मल्टी एक्सेल ट्रक, प्रायव्हेट बस  अशा अवजड वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नियमभंग करणारी अनेक वाहने आढळली. त्यामध्ये काही टिपर वाहने थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात ताब्यात घेऊन ठेवण्यात आली. जोपर्यंत दंड भरला जात नाही किंवा कागदपत्रे सादर केली जात नाहीत तोपर्यंत ती वाहने मुक्त करण्यात आलेली नाहीत. वाहतूक शाखेच्या पथकाने परवाना जवळ नसणे, नो-एन्ट्री झोनमध्ये प्रवेश करणे, वाहन धोकादायक स्थितीत चालविणे, वाहन विमा नसणे, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र नसणे, फॅन्सी नंबरप्लेट ला...

इंटरक्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शारदानगरच्या जलतरणपट्ची नेत्रदीपक कामगिरी

इमेज
  इंटरक्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शारदानगरच्या जलतरणपट्ची नेत्रदीपक कामगिरी शारदनगर:- दिनांक २६.८.२०२५ द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशन पूणे यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने दिनांक २३ व २४ ऑँगस्ट २०२५ रोजी शारदानगर येथील जलतरण तलावावर खुल्या जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला विविध वयोगट व विविध स्विमिंग प्रकारात महाराष्ट्रातील पु्णे, मुंबई, छ. संभाजीनगर, अमरावती, सोलापूर यांसह एकूण १८ जिल्हयातील विविध वयोगटातील जवळपास २०० स्पर्धकांनी विविध स्विमिंग प्रकारात भाग घेवून आपले कौशल्या आजमावले. या स्पर्धेत शारदानगर जलतरण तलावात सराव करणाच्या विविध वयोगटातील ३१ मुलानी भाग घेताला व खालील प्रमाणे यश संपादन केले आहे. ६ वर्षाखालील मले:- १. राजवीर विक्रम पवार:- ५० मी. किक बोर्ड - तृतीय क्रमांक १४ वर्षाखालील मली:- १. महती पाटील:- २०০ मि फ्री स्टाईल - प्रथम क्रमांक, २००मि आय. एम. - दुवितीय क्रमांक, १०० मी फ्री स्टाईल दुवितीय क्रमांक, ५० मी फ्री स्टाईल - तृतीय,क्रमांक धृविका गोसावी:- ५० मि बँंक स्ट्रोक प्रथम क्रमांक, १०० मि बँक स्ट्रोक द्...

१ ली इंटर-क्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा बारामतीत

इमेज
१ ली इंटर-क्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा बारामतीत बारामती, ऑगस्ट २०२५ – द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने १ ली इंटर-क्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा बारामतीतील शरदनगर जलतरण तलावावर दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी भव्यदिव्य पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामांकित जलतरणपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचे अप्रतिम कौशल्य, स्पर्धात्मकता आणि क्रीडास्पृहाचा अद्वितीय उत्सव अनुभवायला मिळणार आहे. बारामतीकरांना विशेष निमंत्रण – या ऐतिहासिक स्पर्धेला प्रत्यक्ष उपस्थित राहून जलतरण क्षेत्रातील नवोदित ताऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आपली उपस्थिती खेळाडूंना नवी ऊर्जा व प्रेरणा देणारी ठरेल. 📍 स्थळ : शरदनगर जलतरण तलाव, बारामती 📅 दिनांक : २३ व २४ ऑगस्ट २०२५ अधिक माहितीसाठी संपर्क :द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशन

देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध बारामती वाहतूक पोलिसांची धडक मोहीम*

इमेज
 * देशभक्तीच्या दिवशी नियमभंगाविरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक मोहीम* _१७ वाहनांवर दंडात्मक कारवाई; १२ अल्पवयीन मुलांचा समावेश_ बारामती दि.१५ स्वातंत्र्य दिनाच्या देशभक्तीच्या उत्सवात काही तरुणांनी देशभक्तीपेक्षा 'दणका' आणि 'थाट' दाखवण्याचा प्रयत्न केला. बुलेटवर कानठळ्या बसवणारे सायलेंसर, स्पोर्ट्स बाईकचा अति वेग, ट्रिपल सीट मस्ती आणि वेडीवाकडी वाहने चालवून सुसाट गाडी पळवण्याचा रोडशो त्यांनी शाळा-काॅलेजच्या रस्त्यांवर उभा केला. मात्र बारामती वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या सजगतेसमोर त्यांचा हा  'रोडशो' काही क्षणात थंडावला.         एम.ई.एस.शाळा, बालविकास शाळा, देशपांडे शाळा, टेक्निकल हायस्कूल, अनेकांत शाळा या परिसरात सकाळपासूनच उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वाहतूक शाखेची विशेष पथके तैनात केली. या पथकांनी अभ्यासपूर्वक नाकाबंदी केली. काही वाहने पकडण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष पाठलाग केला. ट्रिपल सीट बसून, मोठा आवाज करत, अति वेगाने व झिगझॅग वाहन चालवणाऱ्यांना थेट जागीच थांबवून दंड ठोठावला. आजच्या मोहिमेत एकूण १७ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली. त्यात ९ बु...

बारामती शहरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जड वाहनाना परवानगी

इमेज
  बारामती :-  बारामती शहरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत  जड वाहनाना परवानगी देण्यात आली. ०७/०८/२०२५ रोजी झालेल्या मिटीगमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी बारामती मधील नागरिक,मालवाहतुदार संघटना, क्रेडाईचे अध्यक्ष व सदस्य हजर होते त्यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सदस्य इतर यांनी बारामती शहरातील बांधकामाचे साहित्य मिळत नसलेने काम थांबलेले आहे. कायदेशिर उपाययोजना करूनच बांधकाम साहित्य मिळावे अशी मागणी केली.चर्चे नंतर सकाळी ७  बाजता ते दूपारी १२:०० वाजता आणी दुपारी १६:००ते रात्रौ २१:००वाजेपर्यंत खडी, क्रश, सेंड, वाळू, माती, मुरूम यांची वाहतूक करणारे टूक, हायवा, टिपर, डंपर अशी अवजड वाहने यांना बारामती शहर हृददीतील महत्वाचे चौक - सम्यक चौक, महात्मा फुले चौक,खंडोबानगर चौक, सातव, गुणवडी चौक, गांधी चौक, फलटण चौक , वाबळे हॉस्पीटल चौक, शिवाजीचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बस स्टॅंड, मोतीबाग चौक, कोर्ट कॉर्नर, सिटी ईन चेौक,पेन्सिल चौक इत्यादी महत्वाचे चौकामथुन व परिसरात बंदी असावी. त्याचबरोबर वाहनाचा वेग २५ कि. मी. प्रति तास असा असावा असे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक ...

बारामतीकरांना शिस्त लावण्यासाठी आता 'घोषणारिक्षा'*

इमेज
 *बारामतीकरांना शिस्त लावण्यासाठी आता 'घोषणारिक्षा'* बारामती वाहतूक पोलिसांचा पुढाकार, नगरपालिकेची मदत..._  बारामती दि. २- : वाहतूक नियम पाळा... चुकीचे पार्किंग करू नका...गर्दी करू नका...अशा विविध घोषणा ऐकायला मिळाल्या की समजायचं, 'घोषणारिक्षा' आली आहे. कारण ही घोषणारिक्षा तुम्हाला वाहतूक नियमही सांगते आणि सांगूनही न ऐकल्यास चांगला भुर्दंड बसवून धडाही शिकवते.           बारामती वाहतूक शाखा आणि बारामती नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यावर शिस्त आणण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एक रिक्षा शहरभर फिरतेय, त्यावर मोठे फलक झळकत आहेत आणि लाऊडस्पीकरवरून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. कुठे गाडी लावून अडथळा केला, कुणी नियम तोडले तर त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी गांभीर्याने पाऊले उचलली आहेत.  रस्त्यावर उतरून वाहतूक पोलीस नागरिकांना सजग करत आहेत. या 'मोठ्या आवाजातल्या' मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. गर्दी कमी होते आहे, रस्...

रिल्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट*अखेर बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई_ दंडासह कोर्टात भरला खटला

इमेज
 * रिल्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट*अखेर बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई_ दंडासह कोर्टात भरला खटला बारामती दि.३०:- सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईचे स्वागत होत आहे.      दि.२५ जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून धावत नेत रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे जणू काही जीव धोक्यात घालून रील शूट करताना दिसत होता. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे वाहतूक पोलीस आणि दुसरीकडे कायद्याची पायमल्ली करणारे बेजबाबदार नागरिक. व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने   (एम.एच ४२ बी.पी. ००९०) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली. वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी ज...

बारामतीत अपघातात ३ मृत्यू नंतर ओव्हरलोड वाहनांवर बारामती पोलिसांची मोठी कारवाई

इमेज
 * ओव्हरलोड वाहनांवर बारामती पोलिसांची मोठी कारवाई* १४ वाहने जप्त बारामती दि.२८:- बारामती शहर व परिसरात ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि हायवा वाहनांवर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड आणि बारामती  वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव शहर पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना सोबत घेऊन मोठी कारवाई करत एकूण १४ वाहने जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती चंद्रशेखर यादव यांनी दिली.       बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच अपघात ही होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे. जप्त केलेली वाहने २ ते १० टनांपर्यंत ओव्हरलोड आढळून आली आहेत. यामध्ये प्रत्येक वाहनावर मोठा दंड होण्याची शक्यता आहे. सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात ...

अमित गोरखे युथ फाउंडेशन चे कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप

इमेज
  पुणे :- दि,२२,७,२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कै. गणपत गोरखे स्मृतिदिनानिमित्त पिंपरी चिंचवड पुणे येथे आमदार अमित  गोरखे व मा.नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमास आमदार अमित गोरखे युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश  नेटके यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना टी-शर्ट वाटप केले आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी  कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग नोंदवला कार्यक्रमात उपस्थित. अमोल कुचेकर महेश नेटके, रोहन फासगे  ,अजय खिलारे, रोहित फासगे कृष्णा पोडमल  सनी नेटके रोहित नेटके, शिवम नेटके, , अभिषेक नेटके, हे सर्व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

*रस्ते अडवून वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या दुकानदारांना बारामती वाहतूक पोलिसांचा दणका

इमेज
  रस्ते अडवून वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या दुकानदारांना बारामती वाहतूक पोलिसांचा दणका बारामती नगरपालिकेच्या मदतीने १० दुकानांवर कारवाई,खटले दाखल_ बारामती दि. १९:- स्वतःचे दुकान मोठे असले, तरी कायद्यापेक्षा मोठे कोणीच नाही' हे दाखवून देताना बारामती वाहतूक पोलिसांनी रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या १० दुकानदारांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.    नेवसे रोड, स्टेशन रोड आणि पाटस रोड परिसरातील काही नामांकित दुकान चालकांनी रस्त्यावरच आपले राज्य मांडले होते, याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कुठे दुचाकी दुरुस्ती, कुठे स्पेअर पार्ट्सची विक्री, तर कुठे चप्पल-कपड्यांचे स्टॉल्स यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. वाहतूक पोलिसांनी या दुकानांवर कारवाई केली त्यामध्ये कपूर ऑटो स्पेअर पार्ट्स, एक्झिक्यूटिव्ह ऑटोमोबाईल्स, ज्येनुनिई स्पेअर पार्ट्स, होरा ऑटो सेंटर (नेवसे रोड) एस के शूज, कियारा लाइफस्टाईल, न्यू भारत कलेक्शन, तिवारी फॅशन, भावना फॅशन (स्टेशन रोड), आदित्य शिव मार्ट  (बिगवन चौक, पाटस रोड) केलेल्या कार...

प्रवासात प्रवाशांचा आणि स्वतःचा जीव महत्त्वाचा-वाहतूक पोलीस निरीक्षक यादव.

इमेज
  रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती * अपघात टाळण्यासाठी बारामती वाहतूक शाखा व हार्मोनी इन्स्टिट्यूटचा संयुक्त उपक्रम_ बारामती दि.१८:- बारामती वाहतूक शाखा आणि हार्मोनी इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन सोल्युशन्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती शहरात 'रस्ता सुरक्षा जनजागृती' कार्यक्रम पार पडला.       रिक्षा चालक आणि विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोन सत्रांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.      या कार्यक्रमात वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय समजावून सांगण्यात आले. रिक्षा चालकांसाठी बसस्थानकात झालेल्या सत्रात अपघाताची कारणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, वाहनाची रचना आणि देखभाल, अग्निशमन यंत्राचा उपयोग, भारवाहन क्षमता आणि सीएनजी टाकीची तपासणी या मुद्द्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विद्या प्रतिष्ठान संस्थेत झालेल्या सत्रात दुचाकी चालवताना मोबाईल वापराचे दुष्परिणाम, अपघाताचे विश्लेषण, शरीरातील नाजूक अवयवांवरील परिणाम, वाहन चालवताना जबाबदारी, वेग नियंत्रण, निर्णय क्षमतेचे महत्त्व याविषयी सवि...

बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात नियम मोडणाऱ्या १०७ वाहनांवर कारवाई करत ठोकला ₹ १,०५,५०० चा दंड*

इमेज
 * बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात नियम मोडणाऱ्या १०७ वाहनांवर कारवाई करत ठोकला ₹ १,०५,५०० चा दंड* _वाहतूक शाखा ऍक्शन मोडवर; टीसी कॉलेज परिसरात पुन्हा कारवाई_ टुकार वाहचालकांची वाहने तात्पुरती जप्त.. बारामती दि. १६:- बारामतीतील टीसी कॉलेज परिसरात वाहनचालकांकडून सातत्याने होणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम राबवत तीन दिवसांत तब्बल १०७ वाहनांवर कारवाई करत १,०५,५०० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. १२, १३ आणि १५ जुलै २०२५ या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आली.           वाहनांवर ट्रिपल सीट बसणे, अतिवेगाने गाडी चालवणे, काळ्या काचा, चुकीच्या किंवा नंबर नसलेल्या प्लेट्स अशा प्रकारांवर ही कारवाई होती. टीसी कॉलेज परिसर हा बारामतीतील महत्त्वाचा व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेला भाग असल्याने येथे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. याआधीही या परिसरात अशीच मोहीम राबवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तीन दिवसांचे विशेष पथक तयार करून ही कारवाई हाती घेण्यात आली. कारवाई दरम्यान काही वाहन...

फॉर्च्यूनर, स्कॉर्पिओ, थार पासून वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई..

इमेज
  फॉर्च्यूनर, स्कॉर्पिओ, थार पासून  वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत वाहनांवर बारामती वाहतूक शाखेची धडक कारवाई बारामती दि.०४:- बारामती शहरात वाहतूक शाखेने 'काळ्या काचा'विरोधात राबवलेली मोहीम आता अधिक आक्रमक झाली असून, अवघ्या १५ दिवसांत स्कॉर्पिओ, थार, फॉर्च्यूनर, वेर्ना, स्विफ्ट ते अगदी अल्टोपर्यंत तब्बल १५२ चारचाकी वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली आहे.आत्तापर्यंत ९ लाख ७५ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.       वाहने गुन्हेगारी हेतूने वापरणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच चाप लावला असून, या मोहिमेदरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील शोध लागला आहे. वाहनांची काळी काच उतरवून, दंड आकारून ती डिटेन करण्यात आली आहेत. याआधी वारंवार दंड केल्यानंतरही वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यामुळे, वाहतूक विभागाने मोहीमच सुरू करून थेट कारवाईचा धडाका सुरु केला. उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवली जात असून, शहरातील विविध चौकांमध्ये तपासणी सुरू आहे. विशेषतः कोर्ट कॉर्नर चौक कसबा चौक परिसरात गेल्या दोन...

_काळया काचा सह साऊंड सिस्टम उतरविली, दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; वाहतूक पोलिसांची कारवाई_

इमेज
 *तीन दिवसांच्या पाठलागानंतर 'ती' चारचाकी अखेर ताब्यात* काळया काचा  सह साऊंड सिस्टम उतरविली, दंडात्मक कारवाईसह कोर्टात खटला दाखल; वाहतूक पोलिसांची कारवाई_ बारामती दि. ३१ :- तीन दिवसांपासून काळ्या काचा, नंबर प्लेटशिवाय आणि भरधाव वेगाने शहरात भरकटणाऱ्या एका संशयित चारचाकी वाहनाचा अखेर बारामती वाहतूक पोलिसांनी छडा लावला आहे. तीन दिवसांच्या पाठलागानंतर ही गाडी ताब्यात घेऊन संबंधित चालकावर कडक कारवाई करण्यात आली आहे.        २४ मे रोजी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे, प्रशांत चव्हाण, प्रदीप काळे, रूपाली जमदाडे आणि प्रज्योत चव्हाण यांच्यासह काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. याच वेळी भिगवण चौकातून काळया काचा असलेली आणि नंबर प्लेट नसलेली एक चारचाकी भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी थांबली नाही आणि वेगाने निघून गेली. यानंतर ती गाडी सिटी इन चौकात थांबवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक पोलीस स्वाती काजळे यांना कळविले. काजळे यांनीही सिटी इन चौकात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, पण वाहनान...

बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर’वर चढला वाहतूक पोलिसांचा बुलडोझर

इमेज
  बारामतीत १११ ‘फटाका बुलेट सायलेन्सरवर’वर चढला वाहतूक पोलिसांचा बुलडोझर _वाहतूक शाखेची धडक मोहीम; लाखोंचा दंडही केला वसूल_ बारामती: दि.५ शहर शांत, सुंदर आणि कायम सुरक्षित राहावं या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने अखेर शहरात ध्वनीप्रदूषणाचा कहर करणाऱ्या ‘फटाका सायलेंसर’वाल्या बुलेटस्वारांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार सूचना, दंडात्मक कारवाया याला केराची टोपली दाखवणाऱ्या टवाळखोरांना चाप लावत आतापर्यंत तब्बल ५८ बुलेट गाड्यांचे फटाका सायलेंसर जागेवरच काढून बुलडोझर चढवला आहे.          या मोहिमेमुळे शहरातील गल्लीपासून मुख्य रस्त्यांपर्यंत ‘धडधड’ करणाऱ्या बुलेटस्वारांना चांगलाच दणका बसला आहे. ही विशेष मोहीम उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात ५६ कारवाया करण्यात आल्या होत्या, तर यावर्षी सुरुवातीपासूनच पोलिसांनी गती वाढवत ५८ कारवाया करत ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांना एकूण १११ चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण ५८ बुलेटस्वारांचे सायलेन्सर वर बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी उपविभाग...

बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी

इमेज
बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी  स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी      बारामती :-पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध्य शस्त्र बाळगणारे, सामान्य लोकांना धमकावून गुन्हे करणारे, अंमली पदार्थ विक्री करणारे, अवैध्य वाळू व्यवसाय करणारे, अवैध्य दारु विक्री करणारे तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्ध पंकज देशमुख पोलीस अधिक्षाक पुणे ग्रामीण यांनी विशेप मोहिम राववून कारवाई करत असताना पुणे ग्रामीण हृद्यीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करणान्या इसम यांचेविरुद्ध कारवाईचा बडगा उगारुन त्यांना एम.पी.डी.ए.कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश स्थानिक पोलीसांना दिले होते.त्यावरुन बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमधील सुहासनगर आमराई बारामती येथे वास्तव्यासअसलेल्या धोकादायक व्यक्ती हर्षद राजु काकड़े उर्फ बागवान वय २८ वर्ष रा. कोअर हाऊस आमराई बारामती ता.बारामती जि. पुणे योचविर्द्ध यापुर्वी जबरी चोरी, भांडण तंटा, खंडणीची मागणी करीत असल्याने त्याची दहशत बारामती शहर व ग्रामीण परिसारात असल्याने त्याचेवर एम.पी. डी.ए. कायद्याअंतर्गत कार्यवाही होणेवावत विलास...

वालचंद नगर मधून सोळा वर्षाच्या मुलीला फुस लावून पळवून नेले

इमेज
 वालचंद नगर मधून सोळा वर्षाच्या मुलीला फुस लावून पळवून नेले        9 एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिवणकाम शिकण्यासाठी गेलेली मुलगी दुपारी तीन वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे मुलीचे आईने मुलीच्या वडिलांना फोन करून सांगितले की मुलगी अजून घरी आलेली नाही मुलीच्या आई-वडिलांनी परिसरात शोध घेतला असता व शिवण क्लास मध्ये जाऊन माहिती घेतली असता शिवण क्लास मधील मैत्रिणीचा फोन घेऊन  मुलगी गेली असून तिला अज्ञात इसमाने पळवून नेले असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी वालचंद नगर पोलीस स्टेशन येथे दिली आहे  भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 137 (2 )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजकुमार दुनगे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत

बारामतीत चोरट्याने दारू पाजून मोटरसायकल चोरली

इमेज
 बारामतीत चोरट्याने दारू पाजून मोटरसायकल चोरली     बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी इसमाने दुचाकी चालकास दारूपाजून त्याची मोटरसायकल चोरून नेल्याची तक्रार सुपा पोलीस स्टेशन येथे दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मनोज साहेबराव घाडगे राहणार निंबुत तालुका बारामती हे योगीराज पद्मराज यादव यांचे कडे शेतीचे कामासाठी मोलमजुरी करत आहेत  26 मार्च 2025 रोजी दुपारी बारा वाजता घाडगे नींबूत येथील नीरा चौकात गेले त्यावेळी त्यांना एक अनोळखी इसम भेटला तो घाडगे  यांना म्हणाला की ज्वारी काढायचे आहे तू माझ्यासोबत येतो का असे म्हटल्यावर यादव त्या अनोळखी इसमा सोबत नींबुत गावातून मोरगाव मार्गे शेरेवाडी सुपा रोडने सुपा गावात जाण्यासाठी घाडगे यांच्याकडे असलेली मोटरसायकल नंबर एम एच 42 बी एल ९२४८ वरून काळखैरेवाडी गावचे हद्दीत पठार वस्ती शेरेवाडी सुपा रोड लगत चिंचेच्या झाडाजवळ आले त्या अनोळखी इसमाने घाडगे  यांना गाडी थांबवण्यास सांगितले त्यानंतर त्याने आणलेली दारू दोघांनी मिळून पिली  दारू पिल्यानंतर घाडगे त्या ठिकाणी झोपले असताना अनोळखी इसम...

बारामतीत गोवंशाचे मांस विक्री करताना इसमास पकडले

इमेज
 बारामतीत गोवंशाचे मांस विक्री करताना इसमास पकडले   बारामती येथील चांदशहावली दर्गा च्या जवळ एका खोलीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे कापलेले गोमांस मिळून आल्यानंतर दादासो जाधव पोलीस कॉन्स्टेबल पोलीसयांच्या फिर्यादी नुसार शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5b 5c 9a अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे हे करीत आहेत बारामती शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना मिळालेल्या माहितीनंतर दादासो जाधव पोलीस कॉन्स्टेबल पोलीस उपनिरीक्षक भंडारे पोलीस हवालदार डांगे पोलीस कॉन्स्टेबल जमादार व पंच खाजगी वाहनाने बातमी मिळाली च्या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाऊन खात्री केली तेव्हा एक इसम हा माणूस कापत असताना दिसला व एक इसम त्याचे समोर उभा होता पोलिसांची चाहूल लागताच उभा असलेला इसम पळून गेला व गोमांस कापत असलेला इसम पोलिसांनी जागीच पकडला शकील इब्राहिम कुरेशी राहणार शक्ती प्लाझा कसाब गल्ली बारामती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आर एस भंडारी यांनी जागी दोन पंचा समक्ष जप्ती-पंचनाम्याने मांस जप्त केले आहे. बारामती शहरात न...

बारामतीत टिप्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू

इमेज
 बारामतीत टिप्परच्या धडकेत   महिलेचा मृत्यू      बारामती शहरातील शिवाजी चौकातुन डोर्लेवाडी कडे जात असताना दुचाकीला टाटा कंपनीच्या टिप्पर नंबर MH42AR 4052 ने मोटरसायकलला (mh42 AP3416) पाठीमागून धडक दिली त्यामुळे या मोटरसायकल वरील महिला रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला टिप्पर चालक यास स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की 9 एप्रिल 2025 रोजी रामा शिंदे व त्याची पत्नी राणी रामा शिंदे असे पाटण कडून त्यांचे मूळ गावी डोर्लेवाडी ता बारामती कडे जात असताना बारामती येथील शिवाजी चौकात सायंकाळी सहा वाजता डोर्लेवाडी कडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली या धडकीत मोटरसायकल वरील महिला रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिला तात्काळ भोईटे हॉस्पिटल येथे हलवण्यात आले व नंतर सिल्वर ज्युबली शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मयत घोषित केले टिप्परचालक नितीन शिवाजी राठोड सध्या राहणार रुई मूळ राहणार धनगरवाडी तालु...

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

इमेज
 बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या   महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार          बारामती शहरातील प्रतिष्ठित वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या वनाधिकारी महिलेचे प्रेम संबंध असल्याचे व त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने वकिलाच्या पत्नीला वनाधिकारी असलेल्या घटस्फोटासाठी आलेल्या महिलेने जातिवाचक शिवीगाळ करून वारंवार अपमानित केले असल्याची तक्रार वकिलाची पत्नी हिने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2025 रोजी दिले असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1) r  3(1) s 3(2) va व भारतीय न्याय संहिता डीएनएस 2023 कलम 115( २) 351( 2) 351 (3)3 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सुदर्शन राठोड हे करीत आहेत  याबाबत मिळालेले माहिती अशी आहे की बारामती शहरातील प्रतिष्ठित वकील यांच्याकडे सप्टेंबर 2023 मध्ये वनाधिकारी असलेली महिला स्वतःची सोडचिट्टी व घटस्फोटाची केस घेऊन आली होती तिची केस दाखल केल्यानंतर त्या वनाधिकारी महिलेने वकिलांना सतत येऊन भेटणे महागड्या वस्तू भेट म्हणून देणे वकिलांना सत...

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम

इमेज
 *वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम* बारामती वाहतूक पोलिसांकडून ७० रिक्षांची तपासणी अन् ८ जणांवर दांडात्मक कारवाई बारामती शहरातील काही रिक्षाचालक प्रवाशांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तसेच गैरवर्तनाच्या तक्रारी मिळाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरातील विविध प्रमुख चौकांत विशेष तपासणी मोहिम राबवण्यात आली.         या मोहिमेत मेडिकल कॉलेज, महिला हॉस्पिटल, सिटी इन चौक, श्रीराम नगर चौक, तीन हत्ती चौक, भिगवन चौक व बारामती बसस्थानक परिसरातील एकूण ७० रिक्षांची तपासणी करण्यात आली. वाहन चालवण्याचा परवाना, विमा (इन्शुरन्स), वाहनाची फिटनेस स्थिती, चालकांचे गणवेश आणि इतर नियमांचे पालन होत आहे की नाही? याची बारकाईने पाहणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान ८ रिक्षाचालकांवर कारवाया करून एकूण ७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, एका रिक्षाचालकाला गुटखा खाऊन वाहन चालवत असल्याबद्दल २०० रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स...