धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या वारामती या पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २१ सप्टेंबर २०२५ रोजी जिजाऊ मंगल कार्यालय श्रीरामनगर भिगवण रोड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली
सभेच्या सुरूवातीला जिजाऊ कार्यालयातील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी पुतळ्यास पुष्पहार घालुन वंदन करण्यात आले. संस्थेच्या संचालिका सौ जयश्री भगत, माजी संचालिका सौ किर्ती सावंत, माजी संचालिका सी अनुराधा लोंढे तसेच संस्थेच्या सभासद सौ ज्योती गाडे यांचे हस्ते धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार घालुन दिपप्रज्वलन करण्यात केले. श्री सलीमभाई सय्यद यांच्या सुरेल आवाजात देशभक्तीपर व इतर मराठी व हिंदी गाण्याने सभेची सुरूवात झाली. संस्थेचे चेअरमन मा. डॉ. श्री प्रमोद भगत यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी सन २०२४. २५ अखेर संस्थेच्या ठेवी रू. ८५ कोटींच्या पुढे गेलेल्या आहेत. संस्थेचे वसुल भागभांडवल ३ कोटी ८९ लाख ४८ हजार इतके आहे. तर कर्ज येणे वाकी रू. रू.६३ कोटी ६७ लाख ६७ हजार ९२९ रू. इतकी आहे. संस्थेस सन २४.२५ मध्ये एकुण नफा १ कोटी ८ लाख ६० हजार ३५५ इतका झालेला आहे. संस्थेची गुंतवणुक रू.३२ कोटी ८८ लाख ६३ हजार १६ इतकी आहे. सभासदांना सन २४ २५ साठी १०% इतका लाभांश जाहिर केला. संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ श्री दिलीप लोंढे यांनीदेखील संस्थेच्या कार्याचे सुरूवातीपासुनचे कामकाजाचा आढावा घेतला संस्थेचे व्यवस्थापक श्री हनुमंत गाडे यांनी अहवाल वाचन करून सर्व विषयांना सभासदांकडुन मंजुरी घेतली संस्थेची माहिती देऊन महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे प्रा. श्री. संजय नेवसे यांनी सभासदांचे कर्तव्य व जवाबदारी यासंदर्भात उपस्थित सभासदांना माहिती दिली सभेला निमंत्रित, सभासद, ठेवीदार, कर्जदार वहुसंख्येने उपस्थित होते. यासभेमध्ये निमंत्रितांपैकी डॉ श्री चंदकांत पिल्ले, प्रा. श्री धनसिंग जगताप, प्रा. श्री. भरत शिंदे, श्री तुळशीदास केसकर, प्रा. श्री महम्मदसलीम वागवान , श्री. महादेव फडतर (बापु), श्री अरविंद तावरे, श्री सुहास पवार संस्थेला ऑडीट वर्गाचा अ वर्ग मिळाल्यामुळे सभेस उपस्थित असणारे ठेवीदार कर्जदार सभासद कर्मचारी संचालक मंडळ आनंदी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेच्या कर्मचारी नम्रता सुभेदार व रेश्मा पंचवाघ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक श्री त्रिशरण खुंटे यांनी केले. संस्थेच्या सभासद सौ. शुभांगी कोठारी यांनी पसायदानाने सभेची सांगता झाली. यावेळी संस्थेच्या सभासदांना ठेवीदारांना कर्जदारांना निमंत्रितांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.