अजित पवार सोलापूर जिल्ह्यात तर बारामतीकर पाण्यात
बारामती शहरातील सहयोग सोसायटी जवळ असणाऱ्या भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना त्रास होत आहे त्यांचेकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही त्यामुळे स्थनिक नागरिकांनी पाण्यात उतरून अमरण उपोषण सुरु केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे नुकसान पाहणी करण्याकरिता दौरा करीत आहेत तर बारामतीत पावसाने त्रस्त झालेले आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे बारामतीच्या विकासाची पोलखोल झाली असून बारामती नगरपरिषद आता तरी नागरी सुविधाकडे लक्ष देऊन प्रश्न सोडविणार का? हा खरा प्रश्न आहे. बारामती त आंदोलन होत असल्याने बारामतीच्या विकासाचा फुगा फुटला असून सुशोभीकरण ठराविक भागात आणि मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष असे चित्र आहे