रिल्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट*अखेर बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई_ दंडासह कोर्टात भरला खटला

 *रिल्स बनवण्यासाठी दुचाकी चालकाचा फूटपाथवर जीवघेणा स्टंट*अखेर बारामती वाहतूक शाखेने शोध घेत केली कारवाई_

दंडासह कोर्टात भरला खटला



बारामती दि.३०:- सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फूटपाथवरून भरधाव वेगात दुचाकी चालवत थरारक रील बनवणाऱ्या एका युवकावर बारामती वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगलाच धडा शिकवला आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईचे स्वागत होत आहे.

     दि.२५ जुलै रोजी एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक युवक दुचाकी फूटपाथवरून धावत नेत रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचे जणू काही जीव धोक्यात घालून रील शूट करताना दिसत होता. एकीकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करणारे वाहतूक पोलीस आणि दुसरीकडे कायद्याची पायमल्ली करणारे बेजबाबदार नागरिक. व्हिडिओचा माग काढत बारामती वाहतूक शाखेने   (एम.एच ४२ बी.पी. ००९०) ही दुचाकी गाडी तात्काळ शोधून काढली. संबंधित युवकाची ओळख आदित्य जाधव (रा. बारामती) अशी पटली. वाहतूक शाखेने गाडी ताब्यात घेऊन (मोटार वाहन कायदा कलम २०७ नुसार) नोटीस बजावली. त्याचबरोबर सदर दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आली होती.

    विशेष म्हणजे, या कारवाईत आत्ताच्या वाहतूक नियम उल्लंघनाबरोबरच यापूर्वी त्याच गाडीवर फूटपाथवर 'नो पार्किंगचा' जुना दंडही बाकी असल्याचे उघड झाले असून तोही वसूल करण्यात आला आहे. त्याबरोबर या चालकावर खटला तयार करून कोर्टात पाठविण्यात आला. अशा प्रकारे फूटपाथचा वापर चुकीच्या पद्धतीने करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप शेखिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव वाहतूक पोलीस जवान प्रदीप काळे अजिंक्य कदम प्रज्योत चव्हाण यांनी केली आहे

शहरात वाहनांची वाढती संख्या पाहता कुणाच्याही जीवितास धोका होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागावे. फुटपाथ  पादचाऱ्यांना सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी आहे तो हक्क स्टंटसाठी नाही. सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या रीलबाजांविरोधात आम्ही कडक मोहीम हाती घेत आहोत. 

     ~चंद्रशेखर यादव

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी