बारामती शहरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जड वाहनाना परवानगी
बारामती :- बारामती शहरात दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत जड वाहनाना परवानगी देण्यात आली. ०७/०८/२०२५ रोजी झालेल्या मिटीगमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी बारामती मधील नागरिक,मालवाहतुदार संघटना, क्रेडाईचे अध्यक्ष व सदस्य हजर होते त्यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सदस्य इतर यांनी बारामती शहरातील बांधकामाचे साहित्य मिळत नसलेने काम थांबलेले आहे. कायदेशिर उपाययोजना करूनच बांधकाम साहित्य मिळावे अशी मागणी केली.चर्चे नंतर सकाळी ७ बाजता ते दूपारी १२:०० वाजता आणी दुपारी १६:००ते रात्रौ २१:००वाजेपर्यंत खडी, क्रश, सेंड, वाळू, माती, मुरूम यांची वाहतूक करणारे टूक, हायवा, टिपर, डंपर अशी अवजड वाहने यांना बारामती शहर हृददीतील महत्वाचे चौक - सम्यक चौक, महात्मा फुले चौक,खंडोबानगर चौक, सातव, गुणवडी चौक, गांधी चौक, फलटण चौक , वाबळे हॉस्पीटल चौक, शिवाजीचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बस स्टॅंड, मोतीबाग चौक, कोर्ट कॉर्नर, सिटी ईन चेौक,पेन्सिल चौक इत्यादी महत्वाचे चौकामथुन व परिसरात बंदी असावी. त्याचबरोबर वाहनाचा वेग २५ कि. मी. प्रति तास असा असावा असे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे