बारामतीत गोवंशाचे मांस विक्री करताना इसमास पकडले
बारामतीत गोवंशाचे मांस विक्री करताना इसमास पकडले
बारामती येथील चांदशहावली दर्गा च्या जवळ एका खोलीमध्ये गोवंश जातीचे जनावराचे कापलेले गोमांस मिळून आल्यानंतर दादासो जाधव पोलीस कॉन्स्टेबल पोलीसयांच्या फिर्यादी नुसार शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5b 5c 9a अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे हे करीत आहेत बारामती शहर पोलीस निरीक्षक विलास नाळे यांना मिळालेल्या माहितीनंतर दादासो जाधव पोलीस कॉन्स्टेबल पोलीस उपनिरीक्षक भंडारे पोलीस हवालदार डांगे पोलीस कॉन्स्टेबल जमादार व पंच खाजगी वाहनाने बातमी मिळाली च्या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाऊन खात्री केली तेव्हा एक इसम हा माणूस कापत असताना दिसला व एक इसम त्याचे समोर उभा होता पोलिसांची चाहूल लागताच उभा असलेला इसम पळून गेला व गोमांस कापत असलेला इसम पोलिसांनी जागीच पकडला शकील इब्राहिम कुरेशी राहणार शक्ती प्लाझा कसाब गल्ली बारामती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आर एस भंडारी यांनी जागी दोन पंचा समक्ष जप्ती-पंचनाम्याने मांस जप्त केले आहे. बारामती शहरात नगरपरिषदेचे किरकोळ मांस विक्रीसाठी बीफ मार्केट असताना अवैध व्यवसाय करण्यासाठी असे प्रकार होतं असल्याची चर्चा आहे