बारामतीत टिप्परच्या धडकेत महिलेचा मृत्यू

 बारामतीत टिप्परच्या धडकेत   महिलेचा मृत्यू    


 बारामती शहरातील शिवाजी चौकातुन डोर्लेवाडी कडे जात असताना दुचाकीला टाटा कंपनीच्या टिप्पर नंबर MH42AR 4052 ने मोटरसायकलला (mh42 AP3416) पाठीमागून धडक दिली त्यामुळे या मोटरसायकल वरील महिला रस्त्यावर पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तिचा मृत्यू झाला टिप्पर चालक यास स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की 9 एप्रिल 2025 रोजी रामा शिंदे व त्याची पत्नी राणी रामा शिंदे असे पाटण कडून त्यांचे मूळ गावी डोर्लेवाडी ता बारामती कडे जात असताना बारामती येथील शिवाजी चौकात सायंकाळी सहा वाजता डोर्लेवाडी कडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली या धडकीत मोटरसायकल वरील महिला रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिला तात्काळ भोईटे हॉस्पिटल येथे हलवण्यात आले व नंतर सिल्वर ज्युबली शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मयत घोषित केले टिप्परचालक नितीन शिवाजी राठोड सध्या राहणार रुई मूळ राहणार धनगरवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचे विरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023 कलम 106 125 a125 b 281 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुप्रिया गोरे या करीत आहेत संदीप मारुती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा