बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल

 बारामतीत वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या 

महिलेसोबत प्रेम संबंध बायकोची तक्रार       


 


बारामती शहरातील प्रतिष्ठित वकिलाचे घटस्फोटासाठी आलेल्या वनाधिकारी महिलेचे प्रेम संबंध असल्याचे व त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने वकिलाच्या पत्नीला वनाधिकारी असलेल्या घटस्फोटासाठी आलेल्या महिलेने जातिवाचक शिवीगाळ करून वारंवार अपमानित केले असल्याची तक्रार वकिलाची पत्नी हिने बारामती शहर पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2025 रोजी दिले असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1) r  3(1) s 3(2) va व भारतीय न्याय संहिता डीएनएस 2023 कलम 115( २) 351( 2) 351 (3)3 52 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपाधीक्षक सुदर्शन राठोड हे करीत आहेत

 याबाबत मिळालेले माहिती अशी आहे की बारामती शहरातील प्रतिष्ठित वकील यांच्याकडे सप्टेंबर 2023 मध्ये वनाधिकारी असलेली महिला स्वतःची सोडचिट्टी व घटस्फोटाची केस घेऊन आली होती तिची केस दाखल केल्यानंतर त्या वनाधिकारी महिलेने वकिलांना सतत येऊन भेटणे महागड्या वस्तू भेट म्हणून देणे वकिलांना सतत फोन करणे एसएमएस करणे घड्याळ टॅब पैसे सतत देणे हे वकिलाच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर वकिलाच्या पत्नीने वनाधिकारी असलेल्या महिलेला विचारणा केली असता चिडून जाऊन त्या वनाधिकारी महिलेने तुझ्या नवऱ्याचे व माझे प्रेम संबंध आहेत आम्ही लग्न करणार आहोत म्हणून तुला काय करायचे ते कर तुला नवरा सांभाळता येत नाही नवरा कसा सांभाळायचा हे तुला मी दाखवते व जातिवाचक शिवीगाळ करून आमची प्रेम संबंध आहेत आमच्या मध्ये पडू नको माझे खूप वरपर्यंत हात पोहोचले आहेत असे म्हणून वनाधिकारी महिलेने वारंवार अपमानित करून धक्काबुक्की करून कपडे फाडले आहेत असेही तक्रार वकिलाच्या पत्नीने दिलेले आहे ही घटना 26 एप्रिल 2024 रोजी घडली होती पत्नीने आक्षेप घेतल्यानंतरही वकिलाचे व वनाधिकारी घटस्फोटासाठी आलेल्या महिलेचे प्रेम संबंध थांबले नाहीत म्हणून 18 डिसेंबर 2024 रोजी वनाधिकारी महिला ही बारामती मध्ये आली असल्याचे समजल्यानंतर बारामती बस स्थानकाच्या कॉर्नरला वकीलपती हे त्या महिलेसोबत असल्याचे फिर्यादी महिलेला दिसले त्यावेळी वकील पत्नीने वनाधिकारी महिलेला माझ्या नवऱ्यापासून लांब राहा असे सांगितल्यानंतर माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यावेळी मला जातीवाचक शिवीगाळ केली 18 मार्च 2025 रोजी वकील पती व वनाधिकारी महिला हे बारामती मध्ये एका कारमध्ये फिरत असल्याचे समजल्यानंतर वकिलाच्या पत्नीने त्यांना फोन करून तुम्ही काम नसताना माझ्या नवऱ्यासोबत का फिरत आहात अशी विचारणा केल्या असता वकिलाच्याच फोनवरून पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करून तू माझ्या नादी लागू नको अशी दमदाटी केली मी अधिकारी असल्याने मला कायदा चांगला कळतो हे सांगून ती  वकील नवऱ्याबरोबर निघून गेली . वनाधिकारी महिला व वकील यांचे मध्ये सतत कॉल व्हाट्सअप मोबाईल चॅटिंग व्हिडिओ कॉल संभाषण करत होते असे सर्व चालू असतानाच वकिलाच्या मुलाने ते पाहिल्यानंतर त्याच्या आईला ते सांगितले वनाधिकारी महिलेने माझ्या नवऱ्याचा नाद सोडावा म्हणून यावरून वकिलाची वकिलाच्या पत्नीची सतत भांडणे होत होती

 18 मार्च 2025 रोजी चार वाजता वकील व त्याची पत्नी घरी असताना वकिलाच्या मोबाईलवर वनाधिकारी महिलेचा फोन आला त्यावेळेस तो फोन वकिलाकडून घेऊन वकिलाच्या पत्नीने  विचारत असताना पुन्हा जातीवाचक बोलून तुम्ही किती शिकल्या तरी सुधारणार नाही असे म्हणून अपमानित केले  नवरा  बारामतीतील प्रतिष्ठित वकील असल्यामुळे  उगीच बदनामी नको   वकिलाच्या पत्नी इतके दिवस गप्प राहिले होते वनाधिकारी महिलेला वारंवार सांगूनही तिच्या वर्तनात सुधारणा न होता उलट सतत जातीवाचक बोलून वारंवार हेटाळणी केली व अपमानित केले असे वकिलाच्या पत्नीने फिर्यादीत नमूद केले आहे

baramatitoday

*बारामती शहरात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या चौघांची थेट मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी* अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची कारवाई

बारामती शहर पोलीस स्टेशन हृद्यीतील गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध अमरावती कारागृहात रवानगी