बारामतीत चोरट्याने दारू पाजून मोटरसायकल चोरली
बारामतीत चोरट्याने दारू पाजून मोटरसायकल चोरली
बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोळखी इसमाने दुचाकी चालकास दारूपाजून त्याची मोटरसायकल चोरून नेल्याची तक्रार सुपा पोलीस स्टेशन येथे दिली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी आहे की मनोज साहेबराव घाडगे राहणार निंबुत तालुका बारामती हे योगीराज पद्मराज यादव यांचे कडे शेतीचे कामासाठी मोलमजुरी करत आहेत
26 मार्च 2025 रोजी दुपारी बारा वाजता घाडगे नींबूत येथील नीरा चौकात गेले त्यावेळी त्यांना एक अनोळखी इसम भेटला तो घाडगे यांना म्हणाला की ज्वारी काढायचे आहे तू माझ्यासोबत येतो का असे म्हटल्यावर यादव त्या अनोळखी इसमा सोबत नींबुत गावातून मोरगाव मार्गे शेरेवाडी सुपा रोडने सुपा गावात जाण्यासाठी घाडगे यांच्याकडे असलेली मोटरसायकल नंबर एम एच 42 बी एल ९२४८ वरून काळखैरेवाडी गावचे हद्दीत पठार वस्ती शेरेवाडी सुपा रोड लगत चिंचेच्या झाडाजवळ आले त्या अनोळखी इसमाने घाडगे यांना गाडी थांबवण्यास सांगितले त्यानंतर त्याने आणलेली दारू दोघांनी मिळून पिली दारू पिल्यानंतर घाडगे त्या ठिकाणी झोपले असताना अनोळखी इसमाने घाडगे ना तिथेच सोडून त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरून नेली सुपा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता बी बी एन एस 2023 कलम 303 {2} नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज कुमार सुभाषराव नवसारे हे करीत आहेत