जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांचे दर तेजीत
जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांचे दर तेजीत
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केट मध्ये पालेभाज्यांची आवक कमी येत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. विविध भागात सुरू असलेल्या अवकाळी व जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पालेभाज्यांचे नुकसान झाले असल्याने आवक घटली आहे. ज्यामुळे भाज्यांचे दर वाढले असल्याची माहिती समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी दिली.
मेथीची एक जुडी ३० रूपयांना तर कोथिंबीरच्या एका पेंडीचा दर २० रूपये त्याच बरोबर पालक, कांदापात, शेपु, तांदुळजा, मुळा या पालेभाज्यांचे कमाल दर प्रति पेंडी १५ ते २० रूपये निघाले. तसेच प्रति १० किलोचे किमान व कमाल दर गवार ८०० ते १३००, वटाणा १०० ते १५० , शेवगा ८०० ते १२०० असे बाजारभाव मिळाले. गवार ६ क्विंटल, वटाणा ५ क्विंटल तर शेवगा १० क्विंटल आवक झाली. मिरची, काकडी, भेंडी, कारली, प्लॉवर, दोडका, टोमॅटो, शिमला या फळभाज्यांचे दर स्थिर राहुन आवकेत घट झाली. तरी शेतक-यांनी फळे व भाजीपाला विक्रीस आणताना स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा. बाजार समिती मध्ये विविध सुविधा व बाहेरील पेठेतील खरेदीदार येत असल्याने शेतमालाचे दर जादा निघत आहेत असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.