राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध
राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगामार्फत देण्यात आली आहे.