पोस्ट्स

शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान..!

इमेज
  शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान..! बारामती :- (निरावागज )शेतकरी बाळासाहेब कृष्णा मदने (रा: निरावागज. मौजे घाडगेवाडी ) गट नंबर १८८ येथील क्षेत्र २० आर ऊस रविवार (दि:२) रोजी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला आहे. अर्धा एकर मधील ड्रीपलाईन संच व इतर संच या मध्ये जळून ऊसा सहित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतकरी बाळासाहेब मदने हे आपल्या शेतामध्ये सकाळी मोटर सुरू करण्यासाठी निघाले होते. मात्र लांबूनच धुराचे मोठमोठे लोट पाहता मदने यांनी शेताकडे जोरदार धाव घेतली. मात्र तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता . सदर ठिकाणाची पाहणी केली असता शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला असल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब मदने यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा

इमेज
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा बारामती, दि.५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे शवविच्छेदन व शवशीतगृहाची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के आणि न्यायवैद्यकशास्त्र व विषशास्त्र विभागाचे विभाग  प्रमुख तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल शिंदे यांनी दिली. महाविद्यालयाच्या परिसरातील सर्व सुविधानीयुक्त सुसज्ज शवचिकित्सा इमारत उभारण्यात आली असून या इमारतीमध्ये शवचिकित्सा व विद्यार्थी प्रशिक्षणविषयक कामकाज करण्यात येणार आहे. शवचिकित्सागृहामध्ये शीतगृह तयार करण्यात आले असून एकाचवेळी साधारणपणे ४ मृतदेह ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती डॉ.शिंदे यांनी दिली आहे.

मुलीला पळवून नेऊन लग्न केले म्हणून मुलाचे आई वडील व आजोबा यांना मारहाण गुन्हा दाखल

इमेज
  बारामती तालुक्यातील पारवडी येथील कुटुंबातील महिलेने  दिलेल्या फिर्यादीनुसार  भारतीय न्याय संहिता बी एन एस २०२३ कलम ११८ (१)३(५)३५१ (२)३५१(३)३५२ बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे एक महिला व तीन पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                                              दिनांक १६ जानेवारी २०२५ रोजी फिर्यादीच्या मुलाने १९ वर्षीय मुलीसोबत कोणासही न सांगता प्रेम विवाह केलेला आहे सध्या ते कोठे आहे हे त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नाही मुलीचे आई-वडील यांनी या गोष्टीचा मनात राग धरून मुलाचे आई-वडील व आजोबा यांना मारहाण 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता केली असल्याची घटना पारवडी तालुका बारामती येथे घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पुढील तपास पोलीस हवालदार रामदास लक्ष्मण जाधव हे करीत आहेत

बारामती बस स्थानकात रात्री मुक्कामी असलेल्या बसमध्ये चोरी

इमेज
  बारामती बस स्थानकात मुक्कामी असलेल्या हळीयाळ ते बारामती या बसमधील कंडक्टरचे दहा हजार रुपये रोख व १६हजार रुपये रकमेची वस्तू चोरीला गेले असल्याची तक्रार कंडक्टर केमपन्ना काडप्पा कुंभार यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनला दिले आहे      भारतीय न्याय संहिता (बी एन एस )२०२३ कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे     बारामती येथे बस मुक्कामासाठी आलेले असताना रात्री साडेअकरा वाजता झोपले नंतर बस च्या काचा उघडून बसच्या सीटवरील बॅग पत्र्याची बॅग व त्यामधील रोख रक्कम दहा हजार व इतर साहित्य चोरट्याने घेऊन पळ काढला आहे सकाळी उठल्यानंतर कुंभार यांच्या ही चोरी उघडकीस आली यामध्ये दहा हजार रुपये रोख पंधरा हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक मशीन १000 रुपये किमतीचा लोखंडी पात्र तिकीट बॉक्स व एक रुपये दोन रुपये पाच रुपये आठ रुपये अकरा रुपये नऊ रुपये १४ रुपये अठरा रुपये पन्नास रुपये ६० रुपये  १00 रुपये दीडशे रुपये दराची तिकिटे दोनशे रुपये दराची तिकिटे चोरीला गेले आहेत बस नंबर के ए एफ ३४२९ तिचे आतील प्रवासी सीटवर ठेवलेली लोखंडी पेटी,तिकीट मशीन बॉक्स रोख रक्कम व एसटीच...

रास्त भाव दुकान परवाना मिळण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 पुणे, दि. ४: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १३ तालुक्यांमध्ये ४४६ ठिकाणी रास्त भाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून परवाना मिळण्याच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.nic.in या संकेतस्थळावर हा जाहीरनामा उपलब्ध आहे. या जाहीरनाम्यात सविस्तर अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील, नमुना अर्ज आदीबाबतची माहिती समाविष्ट असून संबंधीत तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत याबाबत संपूर्ण तपशील व कोरे अर्ज उपलब्ध आहेत. तहसील कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२५ असा असून तरी इच्छुकांनी विहित मुदतीत अर्ज करावेत; मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी पसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे. 0000

बारामतीकरांनो, वाहतुकीचे नियम माझ्यासहित कुणी मोडू नका - अजित पवार

इमेज
वाहतुक जनजागृती मोहिम पत्रकाचे प्रकाशन; पवारांकडून वाहतूक नियमांचे धडे_ बारामती दि. ३:- वाढती लोकसंख्या पाहता व वाहतुकीची होत असलेली कोंडी पाहता बारामती वाहतुक शाखेने अनेक उपक्रम राबवले आहेत.या नियमांची आवश्यकता पाहता वाहतुक शाखेने नागरिकांमध्ये नियमांची जनजागृती व्हावी यासाठी माहिती पुस्तक तयार केले आहे. प्रत्येक शाळेत जाऊन युवा-युवतींना हे पुस्तक देणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड वाढवण्यात आला आहे. बारामतीकरांनो, कृपा करून वाहतुकीचे नियम माझ्यासहित कुणीही मोडू नका, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.          पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने बारामती येथे पुणे ग्रामीण पोलीस दलातील प्राप्त नवीन वाहनांचे अनावरण तसेच बारामती उपविभागातील उघडकीस आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्यातील मालाचे मूळ मालकास वितरण हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.                                   गेली अनेक महिन्यांपासून बारामती वाहतुक शाख...

बारामतीत भर दिवसा चोरी

इमेज
बारामतीतील कसबा सातवगल्ली येथे घरातील सर्वजण कुलूप न लावता बाहेर गेल्याने चोरट्याने चार तोळ्याच्या पाटल्या व पैंजण चोरी केल्याची घटना घडल्याची गुन्हा बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे                                                              प्रशांत सुरेश सातव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 28 जानेवारी 2025 रोजी सकाळी सुरेश कामानिमित्त बाहेर गेले व नंतर त्याची पत्नी व आई देवदर्शनासाठी फलटण येथे गेले असता भाऊही दुपारी बँकेत गेला परंतु दरवाजाला कुलूप लावायची विसरले या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने घरातील कपाटातून चार तोळ्याच्या पाटल्या व पैंजण चोरी करून पळून गेला                      सुरेश सातव हे दुपारी साडेतीन वाजता जेवण करण्यासाठी घरी गेले असता घरातील सामान अस्ताविस्त पडलेली दिसले व घरातील लोकर ही उघडे असलेले आढळून आले भारतीय न्याय संह...

बारामती रेशीम मार्केट मध्ये कोषास प्रति किलोस रू. ७७०/- उच्चांकी दर

इमेज
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे  रेशीम कोष मार्केट मध्ये दि. ३० जानेवारी २०२५ रोजी  कोषास प्रति किलोस रू. ७७०/- असे उच्चांकी दर मिळाला. सदर दिवशी ४४५  किलो आवक होऊन किमान  रू. ४५०/-  आणि सरासरी   रू. ७२०/- प्रति किलो दर निघाले.  चंद्रकांत दत्तु गुळुमकर रा. साबळेवाडी  यांचे कोषास प्रति किलोस रू. ७७०/- दर मिळाला तर  एकुण रू. १ लाख ७८ हजार रक्कम मिळाली. रेशीम कोष उत्पादक शेतक-यांनी आपला कोष विक्रीस आणताना ग्रेडींग व स्वच्छ करून आणावा म्हणजे कोषास जादा दर मिळेल. तसेच  शेतक-यांनी परस्पर बाहेरील व्यापा-यांना कोष विक्री करू नये. आपला कोष रेशीम कोष मार्केट मध्येच विक्री करावा. बारामती रेशीम कोष मार्केट मध्ये ई-नाम प्रणाली सुरू असल्याने चांगली विक्री व्यवस्था आहे. त्यामुळे इतर व बाहेरील राज्यातील मार्केट प्रमाणे दर मिळत आहेत. बारामती बाजार समिती तर्फे शेतकरी व रिलर्स यांना संबंधित सुविधा उपलब्ध करून देणेत येतील असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.  बारामती मार्केट कमिटी मध्ये रेशीम को...

बारामतीत सुनेला फिनेल पाजून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न - नवरा सासू सासरा दीर जावू नणंद च्या विरुध्द गुन्हा दाखल

इमेज
बारामती :- १ सप्टेंबर २०२० पासुन ते दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत माझे पती निलेश, सासु वंदना, सासरे मारूती, दिर उमेश, व मंगेश, जाऊ शुभांगी, नणंद उमा घनवट   व तिचा पती नितीन धनवट रा. डोर्लेवाडी ता. बारामती यांनी मला माहेरवरून पैसे आण तसेच तु  घरी आलेपासुन आम्ही कर्जबाजारी झाले आहे असे म्हणुन मानसिक व शारिरीक छळ केला आहे व हाताने मारहाण केली आहे व पती निलेश याने माझा गळा दाबुन व फिनेल पाजुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन सौ. आरती निलेश लोणकर यांनी कायदेशिर फिर्याद दिली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2025 BNS-123,85,49,115(2),351(2)(3),352,3(5)  गुन्हा दाखल झाला आहे आरती निलेश लोणकर यांच्या फिर्यादीनुसार नवरा  निलेश मारुती लोणकर वय 35 वर्षे 2) सासु वंदना मारुती लोणकर वय 58 वर्षे 3) सासरे मारूती वय 65 वर्षे 4) दिर उमेश मारुती लोणकर 5) मंगेश मारुती लोणकर, 6) जाऊ शुभांगी, उमेश लोणकर  मुक्ताई टाऊनशिप B1 रूम नं .10 जामदार रोड बारामती व कसबा बारामती   7) ननंद उमा नितीन घनवट वय 33वर्षे 8) नितीन घनवट वय 42 वर्षे दोघे रा. डोर्लेवाडी ता. बारामत...

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड

इमेज
 * सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तानाजी कर्चे यांना अटक- उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड* बारामती, दि.३०: सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी तानाजी कर्चे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली आहे; या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करीत आहेत.  इंदापूर येथील नारायणदास महाविद्यालयासमोरील गेटवर काही मुले गाड्याच्या पुंगळ्या काढून वाहनाची स्पर्धा लावून गोंधळ घालत आहे, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी ‘डायल ११२ टोल फ्री’ क्रमांकावर केली. या परिसरात बस स्थानक, आय कॉलेज असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने स्थळाची तात्काळ पाहणी केली.  या ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणताना सरकारी कामात अडथळा आणत तानाजी प्रभाकर कर्चे, वय २६ वर्षे रा. कौठळी यांनी पोलिसांसोबत वाद घातला. पोलीस शिपाई महेश साधू रणदिवे यांच्यासोबत अरेरावी भाषेचे वापर करत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच त्यांना धक्काबुक...

बारामती वाहतूक शाखा व तालुका पोलिसांनी स्टंटबाजांना शिकवला धडा

इमेज
 *बारामतीत स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल* बारामती दि. २८:- बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन 'स्टंट कारच्या' व्हायरल व्हिडीओने बारामतीकरांचा अक्षरशः थरकाप उडाला. हे व्हिडीओ थेट वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचले, मग काय? या वाहनांचा वाहतूक पोलिसांचे मर्फतीने शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.            याबाबत सविस्तर माहिती अशी, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव यांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची माहिती कळवावी असे आवाहन व्हाट्सअप मेसेज द्वारे केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.  बारामती एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक ते गदीमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहणांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या अणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचे दिसत होते. हा स्टंट जर चालकाच्या अंगलट आला असता तर यात अनेकांना जीवही गमवावा लागला असता. वाहतूकीच...

कृषिक प्रदर्शनाचा समारोप

इमेज
बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा आज सोमवार दि. २० जानेवारी रोजी समारोप करण्यात आला.  या वेळेस श्वान, दुग्ध उत्पादन, देशी गोवंश स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे चेअरमन मा. श्री. राजेंद्र पवार, हिंदुस्थान फिडचे जनरल मॅनेजर श्री. अजय पिसाळ, केव्हीके बारामतीचे विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव, युवा उद्योजक महेश गुळवे यांच्या हस्ते पारितोषिके  वितरण करण्यात आले. श्वान स्पर्धा – विजेत्याचे नाव व बक्षिसाचे स्वरूप  १. टॉय ब्रीड –  प्रथम क्रमांक - श्री. आकाश मोरे, शारदानगर,  रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक  द्वितीय क्रमांक - श्री. अजिंक्य मोरे, शारदानगर , रु. ३०००/-   + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांक – श्री. आदित्य जाधव, बारामती, रु. २०००/-  + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक २. इंडियन ब्रीड – प्रथम क्रमांक - श्री. अर्जुन आढाव, कटफळ,  रु. ५०००/- + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक  द्वितीय क्रमांक - श्री. कैलाश किर्वे, बारामती , रु. ३०००/-   + ट्रॉफी + प्रशस्तीपत्रक तृतीय क्रमांक...

कृषिक २०२५ ला राज्यतील विविध जिल्ह्यातून तसेच कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गोवा राज्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली.

इमेज
  बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवार दि. १८ जानेवारी रोजी राज्यतील विविध जिल्ह्यातून तसेच कनार्टक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गोवा राज्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली.  आज सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यभरातून आलेल्या शेतकर्यांनी गर्दी केली. माती विना शेतीचे प्रयोग, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळ पिके, एक खोड डाळिंब, पेरू, शेवगा, परदेशी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान पाहून शेतकरी हरखून गेले होते.  पशुप्रदर्शनाचे स्वतंत्र दालन असलेल्या या प्रदर्शनात देशी, विदेशी श्वानांचे स्पर्धेमध्ये यामध्ये इंडियन ब्रीड, टॉय ब्रीड यांचा समावेश होता. पशूंच्या स्पर्धेमध्ये कालवड स्पर्धा, खिलार वळू, लाल खंदारी वळू, गायी यांचा सहभाग होता. या स्पर्धेचे पंच क्रांतिसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग होते. या स्पर्धेचा निकाल दि २० जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे.  तसेच दुध देणाऱ्या संकरीत गाईंची दुधाची स्पर्धा उद्या पर्यंत सुरु रहाणार आहे. पशु प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण  ठरलेला शिंदे ड...

*उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सपत्नीक साईचरणी नतमस्तक...

इमेज
शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डीमध्ये दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले त्याची आजपासून सुरुवात होणार आहे. या शिबिरासाठी उपमुख्यमंत्री श्री अजित व खासदार सौ सुनेत्रा  पवार शिर्डी मध्ये आले असता त्यांनी सकाळीच साई बाबांच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीची कृषीपंढरी हजारोंच्या गर्दीने गजबजली

इमेज
  बारामती :- अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या दहाव्या कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातूनही हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली. पुरुष शेतकऱ्यांबरोबरच महिला आणि युवक, युवतींची संख्या यामध्ये लक्षणीय होती.  आज सकाळी आठ वाजल्यापासूनच राज्यभरातून आलेल्या वाहनांनी येथील परिसर गजबजून गेला होता. जर्मनी व जपान मधील कट फ्लॉवर्स पाहण्यासाठी फुलपीक उत्पादकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, त्याचप्रमाणे या प्रदर्शनातील आकर्षण असलेल्या देशी वाणांपैकी काळा कांदा, काळा टोमॅटो, काळी मिरची आवर्जून पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत होते. भोपळ्याच्या विविध आकारातील जाती व त्यांचे उत्पादन पाहून शेतकरी हरखून गेले होते.  आज या प्रदर्शनाला भाजपचे आमदार सुरेश धस तसेच कोल्हापूरच्या संयोगिताराजे छत्रपती, माजी मात्री अनिल देशमुख  यांनी भेट दिली. यावेळी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार व विश्वस्त सौ. सुनंदा पवार यांनी त्यांना अधिक माहिती दिली. कृषिक प्रदर्शनाला मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुर...

पुरूष विभागात पालघर, पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर तर महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर विजयी*

इमेज
२३ वी छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा २०२४-२५* * पुरूष विभागात पालघर, पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर तर महिला विभागात ठाणे शहर, सांगली,  पुणे शहर, पालघर विजयी *    बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय  व   महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष विभागात पालघर,पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर आपआपल्या गटात विजय मिळविले. रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या  वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात पुरूषांच्या  अ गटात  पालघर संघाने अमरावती संघावर ५३-३२ असा विजय मिळविला. मद्यंतराला पालघर संघाकडे २७-१४ अशी आघाडी होती. पालघरच्या प्रतिक जाधवने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमरावतीच्या अभिषेक पवार याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत एकाकी लढत दिली.  ड गटात पुणे शहर संघाने सांगली संघावर ३५-२७ असा विजय मिळविला. मद्य...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'कृषिक २०२५' कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

इमेज
 बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित 'कृषिक २०२५' या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथाज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेयरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल- अजित पवार

इमेज
कृषिक २०२५' या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन  बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी विज्ञान केंद्र माळेगाव खु. येथे आयोजित 'कृषिक २०२५' या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल , अशीही ग्वाही त्यांनी दिली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ खासदार शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर, आयआयटी खरगपूरचे शास्त्रज्ञ डॉ. पियुश सोनी, ॲग्री पायलटचे प्रकल्प संचालक प्रशांत मिश्रा, बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त प्रतापराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आदी उपस्थित होते. जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोध...

कृषी प्रदर्शन कृषिक २५ चे उद्घाटन १६ जानेवारी २५ रोजी सकाळी ८ वा.

इमेज
  बारामती:- बारामती येथील ऍ़ग्रीकल्चरल डेव्हलपमेट ट्रस्ट संचलीत कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे प्रत्यक्षिक आधारीत कृषी प्रदर्शन कृषिक २५ चे उद्घाटन महाराष्ट्राचे कृषी मंत्री ऍ़ड.माणिकराव कोकाटे यांचे हस्ते तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार , क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे , पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार व विश्वस्त सुनंदा पवार यांचे प्रमुख उपस्थितीत व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वा.संपन्न होणार आहे उद्घाटना नंतर ९.३० वा अप्पासाहेब पवार  सभागृह शारदानगर येथे सभा होईल  अशी माहिती ऍ़ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली आहे. शेतकरी व नागरिकांनी उपस्थित रहावे   १६ ते २० जानेवारी पर्यंत [ सकाळी  १० ते सायंकाळी ५ वा]   १७० ए करावरील प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे